किर्रकिर्र वाजला गजर कानात
उठावं म्हटलं पुटपुटत मनात
डोळे चोळत शोधतेय काही,
तर आज सूर्य उठलाच नाही!
अंधार होता निबीड बाहेर
त्यात धो धो पावसाचा आहेर
पण ढगांचे घेऊन पांघरूण
गाढ निजला होता आज अरूण
रात्री जाता जाता चंद्र
त्याला उठवायला विसरला की काय,
रोजच्या सारखा गजर लावायला
काल चांदण्या विसरल्या की काय
विचार केला मी मनाशी
झोपू देत बिचाऱ्याला आजच्या दिवशी
कोवळ्या किरणांची अन रंगांची
वाट पाहीन मी उद्याची
उठावं म्हटलं पुटपुटत मनात
डोळे चोळत शोधतेय काही,
तर आज सूर्य उठलाच नाही!
अंधार होता निबीड बाहेर
त्यात धो धो पावसाचा आहेर
पण ढगांचे घेऊन पांघरूण
गाढ निजला होता आज अरूण
रात्री जाता जाता चंद्र
त्याला उठवायला विसरला की काय,
रोजच्या सारखा गजर लावायला
काल चांदण्या विसरल्या की काय
विचार केला मी मनाशी
झोपू देत बिचाऱ्याला आजच्या दिवशी
कोवळ्या किरणांची अन रंगांची
वाट पाहीन मी उद्याची
No comments:
Post a Comment