बाहेर जरी
गोठवणारी असेल थंडी,
हृदयात मात्र माझ्या
हलक्या हलक्या पावलांनी,
दबकत दबकत
वसंत पाऊले टाकतोय
पक्षांची किलबिल,
फुलांचे हसरे चेहरे,
कोवळे ऊन,
अन भिरभिरणारी माणसे
असं चित्र माझ्या डोळ्यासमोर रंगवतोय
बाहेर प्रकटण्याच्या
कितीतरी आधीच
वसंत माझ्या मनात फुलतोय!
गोठवणारी असेल थंडी,
हृदयात मात्र माझ्या
हलक्या हलक्या पावलांनी,
दबकत दबकत
वसंत पाऊले टाकतोय
पक्षांची किलबिल,
फुलांचे हसरे चेहरे,
कोवळे ऊन,
अन भिरभिरणारी माणसे
असं चित्र माझ्या डोळ्यासमोर रंगवतोय
बाहेर प्रकटण्याच्या
कितीतरी आधीच
वसंत माझ्या मनात फुलतोय!
No comments:
Post a Comment