Saturday, September 23, 2017

संवाद संपून जेव्हा होतो फक्त वाद

देश बदलतो, काळ बदलतो, संदर्भाची चौकट बदलते, आणि नैतिक-अनैतिक ची मोजमापे ही त्यानुसार बदलतात. जेव्हा ही मोजमापे स्थळ, काळ, वेळ यांच्या चौकटीत बांधलेली असतात, तेव्हा ती बदलणं काही अंशी नैसर्गिकच असतं. मात्र आपण जर ह्या मोजमापांना त्रिकाला बाधित सत्य मानत असू, तर मात्र आपण अश्या बदलांचा स्वीकार कदापि करणार नाही. किंबहुना, ज्यांनी अश्या बदलांचा स्वीकार केलाय, त्यांना सुद्धा आपण समजून घेणार नाही.

जर का हे लोक आपले निकट वर्तीय असतील, तर मात्र परिस्थिती फार बिकट होते. त्यात जर व्यक्ती मूल्यनिष्ठ असतील (ज्या लोकांसाठी मूल्यां मधली तफावत पचणारी नसते, म्हणजे की ज्या लोकांना आपल्या पेक्षा वेगळी मूल्ये असलेल्या व्यक्ती ह्या आपल्या वाटत नाहीत), तर मात्र अश्या कुटुंबियां मध्ये संवाद होण्या ऐवजी होतो फक्त वाद.

ह्यावर उपाय आहे काय? मूल्यांमधली निर्माण झालेली दरी ओलांडून पलीकडे पोहोचायचं तरी कसं ? व्यक्ती मोठ्या की मूल्ये ? आपल्याला प्रिय असलेल्या पण वेगळी मूल्ये  असलेल्या व्यक्तींना प्राधान्य द्यायचं की आपल्याला सर्व श्रेष्ठ वाटण्याऱ्या मूल्यांना ?

No comments: